![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १९ जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
चोरांपासून सावध राहावे. विरोधकांचे दडपण राहील. कामाचा ताण जाणवेल. मनाचे औदार्य दाखवाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वादात अडकू नये. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता. प्रकृतीची काळजी घ्यावी.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
घरगुती जबाबदारी समर्थपणे पेलाल. खर्चाकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकार वापराल. तुमचा मान वाढेल. कामाचा जोम वाढेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
भावनेला आवर घालावी लागेल. काही कामे वेळ काढतील. कामाची जबाबदारी वाढू शकते. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. अडथळ्यातून मार्ग काढाल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
शारीरिक कष्ट वाढू शकतात. कार्यप्रविणता दाखवाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. भावनेच्या भरात बोलतांना सारासार विचार करूनच बोलावे. डोकेदुखी सारखे त्रास जाणवू शकतात.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
सामुदायिक वादात अडकू नका. प्रवासात काळजी घ्यावी. व्यावसायिक लाभाचा अधिक विचार कराल. मोठ्या लोकांच्या संगतीत रमाल. कोर्टाची कामे निघतील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
कामाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करावा. अनुदानाची कामे होतील. . कलागुणांना चांगला वाव मिळेल. सरकारी कामात विशेष लक्ष घालावे.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
औद्योगिकदृष्ट्या सतर्कता ठेवावी. वरिष्ठांशी बोलतांना नरमाई ठेवावी. गुरुकृपेचा लाभ होईल. मनाजोगी संगती लाभेल. वडिलधाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. प्रवासात सावधानता बाळगावी. शांतपणे विचार करून ते कृतीत आणाल. आवडत्या गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवितांना सतर्क राहावे.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
एकाच गोष्टीवर अडून राहू नका. मानसिक शांतता राखावी. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. कौटुंबिक सौख्याचा विचार करावा. खर्चाचा विचार करावा.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोर्टाची कामे पुढे ढकलावीत. जोडीदाराचे म्हणणे समजून घ्यावे. कामे मनासारखी पार पडल्याने खुश असाल. चिडचिड करू नये.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी. अति भावनिक होणे टाळावे. आवडते छंद जोपासावेत.