महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आता काही दिवस उरले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. अनेकांनी थर्टी फस्ट निमित्त बाहेर जाण्याचा बेत आखलाय, अशातच तुम्ही जर ३१ डिसेंबरला लोणावळ्यात जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. (Latest Marathi News)
लोणावळ्यात थर्टी फस्टच्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. पोलिसांकडून लोणावळ्यात येणाऱ्या एंट्री पॉईंटवर चेकपोस्ट लावली जाणार आहे. त्याचबरोबर पर्यटनस्थळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलीस (Police) कारवाई करणार आहे. तसा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
थर्टी फस्ट निमित्त राज्यभरातील अनेक पर्यटक लोणावळा (Lonavala) पर्यटनस्थळी येत असतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून शहराच्या शहरातील एंट्री पॉईंटवर चेकपोस्ट लावली जाणार आहे.
पर्यटकांनी लोणावळा खंडाळा परिसरात नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जमावे पण कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच सोबत आणलेल्या लहान मुलांची देखील काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने देखील पर्यटकांना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिक, व्यावसायिक व पर्यटक या सर्वांनी शहरात काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, पर्यटकांच्या व नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.