महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५०१५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४९,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७२,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,३०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५०,१५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५४,७१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,१५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,७१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,१५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४७१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,१८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,७४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७२३ रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)