महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे बुधवारी ३३० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आणि १०० पेक्षा अधिक उड्डाणे प्रभावित झाली. रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांत मिरज, कोल्हापूर, सांगली, पठाणकोट, वाराणसी आणि इतर अनेक शहरांतून चालणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. ३३० पैकी २६८ पूर्णपणे रद्द केल्या, तर ६३ अंशत: रद्द करण्यात आल्या. उत्तर भारतात अनेक रेल्वे उशिराने धावत आहेत.
दिल्लीत १०० उड्डाणांवर परिणाम झाला आहे. धुक्यामुळे बहुतांश विमानांचे मार्ग बदलण्यात आले. कारण सीएटी-आयआयआय इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिममध्ये विमान उतरवण्यामध्ये पायलट प्रशिक्षित नाहीत. या सिस्टिमच्या माध्यमातून धावपट्टीवर किमान दृश्यमानता (आरव्हीआर) ५० मीटर आणि उंची १५ मीटर असली तेव्हा प्रशिक्षित पायलट विमान उतरवू शकतो.