Mayor Election : आता थेट जनतेतून महापौर ? भाजपच्या आग्रहानंतर मोठे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । महापौर निवडीसंदर्भातली आताची मोठी बातमी. सरपंच, नगराध्यक्षाप्रमाणे थेट जनतेतून महापौराची निवड (Mayor is elected by the people) व्हावी यासाठी भाजप (BJP) आग्रही आहे. ( Maharashtra Political News) राज्यात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार आल्यावर पुन्हा सरपंच आणि नगराध्यक्षाच्या निवडणुका थेट होत आहेत. याचधर्तीवर आता महापौरांचीही निवड थेट होण्याचे सकारात्मक संकेत आहेत. (Mayor will be possibility directly elected by the people In Maharashtra)

तसेच महापौर पदाचा कालावधी अडीचऐवजी पाच वर्षांचा होण्याची शक्यता आहे. कॅगकडून राज्य सरकारला तशी शिफारस केली असून, त्यावर उचित निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. विधानपरिषदेत प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला, यात कॅगने महापौर थेट जनतेतून निवडावा आणि त्याचा कालावधी 5 वर्षांचा असावा, असे म्हटले होते. त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस राज्याला केली आहे काय, असा सवाल विचारला. याबाबत अशी शिफारस राज्याला प्राप्त झाल्याचे लेखी उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *