अवघ्या २३ तासांमध्ये दीड वर्षाच्या अपह्त बालकाचा शोध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । अवघ्या २३ तासांमध्ये दीड वर्षाच्या अपह्त बालकाचा शोध घेण्यात पिंपरी पोलीसांना यश..” मुळचे बार्शी, सोलापुर येथील श्री. रवी सुनील पवार व सौ. राधा पवार हे दाम्पंत्य उदरनिर्वाहासाठी सुमारे ३ वर्षांपूर्वी शिवाजीनगर, पुणे येथे स्थायीक झाले होते. त्यांच्या ३ मुलांसह ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पेन, टिश्यु पेपर, इ. वस्तु विक्री करीत होते. दिनांक २७/१२/२०२२ रोजी नेहमीप्रमाणे त्यांचे तीन मुलांना सोबत घेवुन वस्तु विक्रीचे काम चालु होते. दुपारी ०२.१५ वा. सुमारास श्री. रवी पवार हे आंबेडकर चौकातील झाडांच्या कुंड्यालगत मुलांना बसवुन वडापाव आणन्यासाठी बाजुच्या टपरीवर गेले. त्यांच्या पत्नी सिग्नलवर वस्तु विकण्यामध्ये व्यग्र होत्या. श्री. पवार हे मुलांना खाऊ घेवुन १० मिनीटामध्ये परत आले तेव्हा रोहित तिथे नसल्याचे लक्षात आले. त्यांनी पत्नीकडे चौकशी केली असता त्याही अनभिज्ञ होत्या. दोघांनी मिळुन आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता मिळुन आला नाही. आपल्या पोटचा गोळा कोणीतरी हिरावुन नेल्याचे लक्षात येताच त्यांनी पिंपरी पोलीस ठाणे गाठले. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आवताडे सो यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन गुन्हा रजिं. नं. ११३१/२०२२, भा. दं. वि. संहिता कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदविला व मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाणे तपास पथक, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा युनिट-२ येथील पोलीस अधिकारी अंमलदार यांची स्वतंत्र पथके बनवुन घटनास्थळ परिसरात रवाना केली.

घटनास्थळ परिसरातील प्राथमिक तपासामध्ये तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला मुलाला घेवुन जाताना निष्पण्ण झाले ,पुढील तपासाची चक्रे फिरली. सदरील आरोपी महिलेचा माग काढण्यासाठी पिंपरी रेल्वे स्टेशन, पिंपरी गाव, चिंचवड रेल्वे स्टेशन, तळेगाव, देहुरोड, कामशेत, लोणावळा, कल्याण, इ. ठिकाणच्या सुमारे १०० हुन अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. तसेच घटनास्थळावरील प्राप्त आरोपीचे फोटो व अपह्त बालकाचे फोटो लोकांना दाखवुन चौकशी करण्यात आली. तपासा दरम्यान दिनांक २८/१२/२०२२ रोजीचे रात्री आरोपी महिला अपह्त मुलासह शिरगाव परिसरात गेली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर प्रतिष्ठान, शिरगाव येथे एक मुलगा बेवारस असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच पिंपरी पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सावर्डे, श्री. सुर्यवंशी यांनी जावुन शहानिशा केली. त्यामध्ये नमुद गुन्ह्यातील महिला आरोपीअपहत मुलाला सोडुन निघुन गेल्याचे दिसुन आले. त्यास ताब्यात घेवुन फिर्यादीकडे त्याबाबत खात्री करण्यात आली व त्याचा ताबा सुखरुपपणे मुलाच्या आई- वडीलांकडे देण्यात आला. अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्यापासुन अवघ्या २३ तासांत अपह्त मुलाचा शोध घेण्यात यश मिळाले. आरोपी महिलेचा शोध सुरु असुन गुन्ह्याचा तपास सपोनि श्री. दीपक डोंब करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सोो, मा. सह. पोलीस आयुक्त श्री. मनोज कुमार लोहिया सोो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे साो, मा. पोलीस उप-आयुक्त परि-१ विवेक पाटील सोो, मा. पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे), स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग प्रेरणा कट्टे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आवताडे, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनरीक्षक श्री. प्रदिपसिंग सिसोदे, गुन्हे शाखा युनिट- २ तसेच शिरगाव पोलीस चौकीचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. नागरीकांना अवाहन- आपल्या पाल्यांकडे दर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच कोणी बेवारस बालक आपल्या निदर्शनास
आल्यास पोलीसांना तात्काळ अवगत करावे.
(विवेक पाटील)
पोलीस उपायुक्त, परि.- १,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *