महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । श्री एस पी देशमुख शिक्षण संचलित विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल(सी.बी.एस.ई.), विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व विद्याव्हिजन किडीज गार्डन या विद्यालयांचा वार्षिक स्नेहसंमेलन २४ डिसेंबर २०२२ रोजी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शासनाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री तुकाराम पांडुरंग माळी सर, नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक मा. श्री एन. डी.पिंगळे सर, श्री. एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेचे संस्थापक मा. श्री साहेबरावजी देशमुख सर तसेच संस्थेचे अध्यक्ष शामरावजी देशमुख, संचालिका सौ. रोहिणीताई देशमुख, उपाध्यक्ष अक्षय राज देशमुख, सचिव सौ. हर्षल ताई देशमुख, डी.पी. सोनवणे व साधनाताई शहा तसेच मा. श्री.सचिन शेठ इंगळे, निर्मलाताई इंगळे, विजयाताई पाटील त्याचबरोबर शैलजाताई हिम्मतराव शिंदे व मनीषाताई कुंजीर या सर्व मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती लाभली. द्राविडी बीट्स २०२२ या मथळ्याखाली स्नेहसंमेलनाची सुरुवात ब्रह्मोत्सवाने करण्यात आली. ब्रह्मोत्सवापासून सुरू झालेला हा कार्यक्रम दक्षिणात्य सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, कला,क्रीडा व इतर अनेक गोष्टींवर विशेषतः प्रभाव टाकत भारतीय संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सादर करण्यात आले.विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी बुद्धिचातुर्यावर तेनालीराम यांचे उत्कृष्ट असे नाटक सादर केले. संस्कृत भाषेचे महत्त्व एका शालेय विद्यार्थीनीने आपल्या मनोगतातून पटवून दिले. या स्नेहसंमेलनाला मान्यवरांनी व पालकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली . शाळेच्या मुख्याध्यपकांनी आपाआपल्या शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.तसेच या स्नेहसंमेलनामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले.सदर कार्यक्रमात ग्लिटर ग्लीज ब्यूटी यांच्या सहकार्याने नृत्य अविष्कारास एक जिवंतपणा लाभला.
सदर कार्यक्रमातील नृत्य दिग्दर्शनासाठी
१.सौ. श्री मोहंती
२.सौ आसीया शेख
३.सौ.पूनम दरेकर
४.सौ. दीपाली केदारी
५.सौ.किरण राजपूत
यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी वरील नृत्यदिग्दर्शकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.तसेच कार्यक्रमातील उत्कृष्ट नृत्याला पारितोषिके देण्यात आली.
संस्थेच्या संचालिका सौ. रोहिणीताई देशमुख यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडल्या बद्दल सर्वांचे कौतुक केले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.