महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० डिसेंबर । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदींनी अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदींनीच आपल्या आईच्या निधनासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली. आईचा एक फोटो शेअर करत मोदींनी ही माहिती दिली. हिराबेन मोदींच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर अनेक मान्यवरांनी पंतप्रधान मोदींना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. हिराबेन मोदींना श्रद्धांजली अर्पण करताना आम्ही या दु:खद प्रसंगी मोदींसोबत असल्याचं अगदी सर्वपक्षीय नेत्यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यासहीत अनेकांनी आपल्या भावना ट्विटरवरुन व्यक्त केल्या.