महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० डिसेंबर ।
मेष
या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. सत्ताधारी लोकांकडून मदत मिळेल. तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्हाला इतरांचे सहकार्य मिळेल.
वृषभ
वृषभ राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आज धावपळ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटेल.
मिथुन
मिथुन राशींच्या लोकांची आर्थिक प्रगती होईल. आज काही कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आज धावपळ होईल.
कर्क
तुम्हा ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्राची आज प्रगती होईल. आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणताही आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. जोखीम घेऊ नका.
सिंह
सिंह राशींच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. शासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा.
कन्या
आज कन्या राशींच्या लोकांचा सन्मान होण्यची शक्यता आहे. व्यवसायिक क्षेत्रात प्रगती होईल. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. कोणत्याही कामासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.
तुळ
तुळ राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचे विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशींच्या लोकांची सामाजिक कार्यात रुची वाढेल. तसेच तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहतील. आज तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे.
धनु
तुम्ही कोणत्याही कामासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी ठरतील. परदेशी प्रवासाची शक्यता आहे. तुमच्या व्यावसायिक योजना फलदायी ठरतील.
मकर
तुमच्या नात्यातील प्रेम वाढेल. व्यावसायासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. तुमचा सन्मान वाढेल. मात्र मकर राशींच्या लोकांची आज धावपळ होण्याची शक्यता आहे.
कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण स्नेह आणि सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत बळ येईल. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. व्यवसाय करणारे लोक आनंदी राहतील.
मीन
कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आज तुम्ही विविध योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. रागावर नियंत्रण ठेवा. आज संयमाने वागा.