PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतले आईचे शेवटचे दर्शन; पार्थिवाला दिला खांदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० डिसेंबर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज (30 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास निधन झालं. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अहमदाबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आई हिराबेन यांच्या निधनाची बातमी कळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद येथे पोहचले. रुग्णालयातच त्यांनी आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

त्यानंतर आईच्या पार्थिवाला खांदा देऊन पुत्र धर्म निभावला. यावेळी मोदी प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटाला अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. मोदी घरी पोहोचताय अंत्ययात्रेला सुरुवात झाली.

मोदी स्वत: पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले. शववाहनातही बसले. सेक्टर-३० येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. आईजे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आई म्हणजे निष्काम कर्मयोगी व आदर्श मुल्यांनी जीवन जगण्याचे प्रतीक आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *