संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी बत्ती गुल ! वीज ग्राहकांचे हाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ जानेवारी । अदानी इलेक्ट्रिसिटीला समांतर वीज वितरण परवाना देण्याबरोबरच सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी वीज कामगारांनी सुरू केलेल्या संपाच्या झळा आज राज्यभर जाणवल्या. मध्यरात्रीपासून संप सुरू झाल्यानंतर पहाटेपासून बत्ती गुल होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक घरगुती ग्राहकांबरोबरच रूग्णालये, उद्योगधंदे, व्यावसायिकांना मोठा फटका बसला. तिन्ही वीज कंपन्यांचे जवळपास 85 टक्के अधिकारी-कर्मचाऱयांना संपात सहभागी होत निदर्शने केली. वीजनिर्मिती केंद्रात कर्मचारीच नसल्याने चंद्रपूर, खापरखेडा, पारस, कोयना वीज केंद्रातील वीजनिर्मितीकर परिणाम झाल्याने तब्बल 2000 मेगावॅटची घट झाली होती.

वीज कामगारांनी मुंबई, ठाणे, नकी मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नगर, सोलापूर, कोल्हापूरसह किदर्भ आणि मराठकाडय़ात सरकारच्या निषेधार्थ रस्त्याकर जोरदार निदर्शने केली. कीज कर्मचारी डय़ुटीकर नसल्याने कीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड होऊन अनेक भागात नागरिकांना बत्ती गुलचा सामना कराका लागला.

संपाचा मोठा फटका पिंपरी चिंचवड मधील लघुउद्योगांना बसला आहे. येथील 12 हजारापैकी जवळपास दीड हजार लघुउद्योगांचा वीज पुरवठा ठप्प झाला होता. संभाजीनगर, परभणी, जळगाक, अकोला, जालना, सातारा, इचलकरंजी येथील उद्योगांनाही याचा फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *