Amit Shah : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विमानाचं आपत्कालीन लॅडींग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ जानेवारी । केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विमानाचं इमरजेंसी लॅडींग करण्यात आले आहे. कमी दृश्यमानतेमुळं बुधवारी रात्री इमरजेंसी लॅडींग करण्यात आले आहे. अमित शहा यांचं विमान गुवाहाटी च्या गोपीनाथ बोरदोलोई अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं गेलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विमानाचे बुधवारी रात्री गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमित शहा आगरतळाला जाणार होते, पण दाट धुक्यामुळे विमान आगरतळा विमानतळावर उतरू शकले नाही. यामुळे विमान गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.

अमित शाह आज त्रिपुरात भाजपच्या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेला त्या दिवशी उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथून सुरुवात होणार आहे. अमित शहा यांचे रात्री उशिरा गुवाहाटीच्या एलजीबीआय विमानतळावर आगमन झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वागत केले.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह बुधवार रात्री त्रिपुराला जाणार होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, आता कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *