IND VS PAK : भारत पाकिस्तान संघ पुन्हा येणार आमने सामने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ जानेवारी । भारत – पाक सामना म्हंटल की क्रिकेट रसिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो.2022 मध्ये झालेल्या आशिया कप आणि वर्ल्ड कप सामन्यानंतर आता 2023 मध्ये भारत पाक संघ आमने सामने येणार आहेत. गुरुवारी आशिया क्रिकेट काउंसिलने आशिया कप 2023 ची घोषणा करत स्पर्धेच्या फॉरमॅट आणि गटांबाबत माहिती दिली. तसेच आशियन क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष जय शहा यांनी देखील ट्विट करत, आशिया कप सामन्यात 8 संघांचा सहभाग असून यांना दोन गटात विभागले जाईल असे सांगितले. क्रिकेट रसिकांना उत्साहित करणारी गोष्ट ही की या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघ एकमेकांशी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत.

सप्टेंबर 2023मध्ये आशिया कप स्पर्धा होणार असून यंदाही ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. भारत पाकिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ गट एक मध्ये असणार असून दुसऱ्या गटात अफगाणिस्तान, बांगलादेश हे संघ देखील सहभागी होणार असून यात क्वालिफायर राऊंड मधील एका संघाचा समावेश असेल. लीग स्टेज मध्ये 6 सामने खेळवले जाणार असून यानंतर सुपर-4 राउंडचे सामने देखील खेळवले जातील. आशिया कप 2023 स्पर्धे दरम्यान एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत.

आशिया कप 2023 मध्ये तब्ब्ल तीन वेळा क्रिकेट रसिकांना भारत पाक सामने पाहण्याची संधी मिळू शकते. स्पर्धेच्या लीग राउंडमध्ये या दोन संघांची टक्कर नक्की आहे. तर दोन्ही संघानी सुपर 4 राउंड गाठल्यास तेथेही दोघांमध्ये अतितटीची झुंज पहायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *