RBI : देशातील फक्त ‘या’ 3 बँकांमध्ये सुरक्षित आहे तुमचे पैसे! रिझर्व्ह बँकेने यादी केली जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ जानेवारी । Reserve Bank of India : भारतात अनेक बँका आहेत, ज्यात करोडो ग्राहकांची खाती आहेत. यात सरकारी ते खासगी बँकांपर्यंत मोठी यादी आहे, मात्र आता रिझर्व्ह बँकेकडून बँकांबाबत बरीच माहिती देण्यात आली आहे.

आरबीआयने बँकांची यादी जाहीर केली असून, तुमचे पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत आणि कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित नाहीत, हे सांगितले आहे

1 सरकारी आणि 2 खाजगी बँकांची नावे समाविष्ट :

रिझर्व्ह बँकेने देशांतर्गत महत्त्वाच्या बँकांची (D-SIBs) 2022 ची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये एक सरकारी आणि दोन खाजगी बँकांची नावे आहेत. यासोबतच गतवर्षीच्या समाविष्ट बँकांची नावेही आहेत.

एसबीआयसह ‘या’ बँकांचा समावेश आहे

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, 2022 च्या या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त खाजगी क्षेत्रातील HDFC बँक आणि ICICI बँकेची नावे समाविष्ट आहेत. या यादीत अशा बँकांची नावे आहेत, ज्यांच्या तोट्याचा परिणाम देशभरातील आर्थिक व्यवस्थेवर होईल.

या यादीत येणाऱ्या बँकांवर कडक नजर ठेवण्यात आली आहे. RBI च्या यादीनुसार, SBI च्या जोखीम मालमत्तेपैकी 0.60 टक्के टियर-1 म्हणून ठेवण्यात आले आहेत. त्याच वेळी, ICICI आणि HDFC ची जोखीम मालमत्ता 0.20 टक्के आहे.

‘ही’ यादी 2015 पासून प्रसिद्ध होत आहे

वर्ष 2015 पासून, रिझर्व्ह बँक अशा बँकांची यादी जारी करते ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्वाच्या आहेत आणि RBI त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवते. बँकांना आरबीआयकडून रेटिंगही दिले जाते, त्यानंतरच या महत्त्वाच्या बँकांची यादी तयार केली जाते. सध्या या यादीत 3 बँकांची नावे आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *