महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारी (ता. ५) स्थानिक नागरिकांसह येथील टोलनाक्यावर टोलवसुली सुरू केली आहे. हा टोल नाका तत्काळ बंद करण्याची मागणी नाशिक पुणे रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे. टोलनाका बंद न केल्यास सचिन काळभोर वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
काळभोर म्हणतात की, ‘मोशी टोल नाका मुदत संपली म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता. आज पुन्हा राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मोशी टोल नाका सुरू करण्यात आला आहे. मोशी टोल नाका प्रकरणी राज्य सरकारने मुदतवाढ देऊ नये ही नम्र विनंती अन्यथा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना विनाकारण टोल भरावा लागेल.