Gold-Silver Rate : आज सोन्याचा नवीन विक्रम ; जाणून घ्या आजचे भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । Gold-Silver Rate : सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे लवकरच बाजारात नवीन विक्रमी वाढ होऊ शकते. शुक्रवारी देखील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्यामध्ये जोरदार वाढ झाली आहे. 

आजही सोन्याच्या दरात 0.14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. याशिवाय चांदीच्या दरातही 0.43 टक्क्यांनी वाढ होत आहे . मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 55,368 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर जात आहे. त्याच वेळी, काल सोन्याचा भाव 0.90 टक्क्यांनी घसरला. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, सोन्याने आपल्या सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केल्याने पुन्हा एकदा नवीन विक्रमी पातळी निर्माण होईल.

चांदीच्या दरातही आज वाढ सुरूच आहे. चांदीचा भाव 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 68,370 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे. याशिवाय शेवटच्या व्यवहारात चांदीचा भाव 1,168 रुपयांनी घसरून 68,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *