Weather Updates : पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; कुठे थंडी तर कुठे धुक्याची चादर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । राज्यात तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडी (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात पावसाची स्थिती देखील निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याचं चित्र दिसत आहे. नंदूरबारमध्ये (Nandurbar) तापमानाचा पारा 8.5 ते 9 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. तर धुळे जिल्ह्यात 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा कडाका वाढला असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातही पारा घसरला
पश्चिम महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरला आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यात तापमानाचा पारा 15 अंशावर गेल्यानं हुडहुडी वाढली आहे. तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

नंदूरबार जिल्ह्यात कडाक्याची थंडी
नंदूरबार जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये (Satpura Mountain Range) तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. तिथे तापमानाचा पारा 8.5 ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे. तर तोरणमाळ परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. थंडी वाढल्याचा परिणाम मानवी जनजीवनावर होत असल्याचे चित्र दिसत आहे.

धुळे जिल्ह्याचा पारा 11 अंशावर
धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 11 अंश सेल्सिअसवर गेला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कडाक्याची थंडी वाजत आहे. या थंडीचा परिणाम हा दिवसभर जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळं सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या घटली आहे. दुसरीकडं दिवसभर धुक्याची चादर पसरली असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आज तापमानात तब्बल चार अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने वातावरणातील गारठा काही प्रमाणात कमी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *