महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवडी कोर्टात हजर का राहता आलं नाही याचं कारण स्पष्ट केलं आहे. ‘वाहतूक कोंडीमुळे कोर्टात जाऊ शकलो नाही. कोर्टात हजर राहू शकलो नाही याची मनात खंत आहे. कोर्टाचा अवमान केला नाही. ” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करत थेट कोर्टात खटला दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी, भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्हा जेलवारी घडवणार असं विधान केलं होतं. अशातच आज राऊतांविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे.