महाराष्ट्र 24- ऑनलाईन – पिंपरी चिंचवड : विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – covid – 19 विषाणूचा प्रादुर्भाव पाहता शहरातील खाजगी व शासकीय डॉक्टरांची सुरक्षा महत्वाची असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी डॉक्टरांना N 95 मास्कचे वाटप केल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली. यावेळी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, पिंपरी चिंचवड शाखेचे पदाधिका-र्यांनी शहरातील १४०० डॉक्टरांच्या वतीने आमदार बनसोडे यांच्याहस्ते N 95 स्वीकारले. यावेळी डॉक्टर संघटना पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेत, कोणत्याही परिस्थितीत शहरातील खाजगी डॉक्टरांनी सेवा बंद ठेऊ नयेत असे आवाहन केले.
शासन यंत्रणेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झालेला असून खाजगी डॉक्टर सुध्दा कोरोना सोबतच्या लढाईत मागे राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने घाबरून न जाता स्वताःची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याबात डॉक्टरांनी शहरातील नागरिकांना उपलब्ध माध्यामातून सतत मार्गदर्शन करावे, असेही विचार बनसोडे यांनी मांडले. उदाहरणातून बनसोडे म्हणाले ‘सोनाराने कान टोचल्यावर दुखत नाहीत’ या म्हणी प्रमाणे डॉक्टरांनी रुग्णाला सांगितलेली गोष्ट रुग्ण जबाबदारीने पाळतो.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्व जगात झालेला असून यामध्ये बहुसंख्य डॉक्टर इतर रोगावर उपचार करत असताना कळत नकळत कोरोना या व्याधीने बाधित होत आहेत . त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोरोना विषाणू या व्याधींपासून बचावासाठी पुरेशी अशी संरक्षक साधने उपलब्ध नाहीत . नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवडमधील सर्वात मोठी अशी वैद्यकीय संघटना आहे . या संघटनेचे राज्यात व देशात सहा लाख सदस्य आहेत . जो डॉक्टर समाजाची एवढी सेवा करतो त्याचं आरोग्य चांगल असणे आजच्या परिस्थितीमध्ये फार महत्त्वाचे आहे त्या भावनेतून पिंपरी चिंचवडमधील पिंपरी मतदारसंघाचे आमदार .मा. अण्णासाहेब बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड, निमा शाखेला डॉक्टरांच्या संरक्षणासाठी N95 मास्क आज हॉटेल ग्रॅण्ड एक्झोटिका येथे निमा संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यजित पाटील यांना सुपूर्त केले. आवश्यकतेनुसार पुढेही पुरवठा करण्याचे आश्वासन बनसोडे यांनी दिले. याप्रसंगी निमा, विमा स्थानिक, निमा, स्टेट व सेंट्रलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . डॉ. सुनील पाटील डॉ. सत्यजित पाटील, डॉ. अभय तांबिले ,डॉ. नंदकुमार माळशिरस्कर, डॉ. दत्तात्रय कोकाटे ,डॉ. सुहास जाधव विमा तर्फे डॉ. कल्पना एरंडे डॉ. मयुरी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.