सोनं ६० हजार रुपये पार करण्याच्या तयारीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ जानेवारी । या वर्षी २०२३ मध्ये सोन्याचा भाव ६०,००० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अनेकांनी याबाबत अंदाज बांधला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव (Gold Price)वाढण्यामागे कोणती कारणे आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. कॉमेक्स मार्केटमध्ये (Comex Market) गोल्ड फ्यूचर प्रति औंस $१८५२ पर्यंत खाली आले आहे आणि सोन्याच्या स्पॉटची किंमत प्रति औंस $१८४७ पर्यंत खाली आली आहे.

४ जानेवारी २०२३ रोजी सलग तिसर्‍या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या सोन्याचे भाव दोन वर्षांच्या उच्चांकावर आहेत. तर चांदीचा भावही ७० हजारांच्या वर आहे. अशात आता सोनं ६० हजार रुपये पार करण्याच्या तयारीत आहे. पण याची नेमकी कारणं काय? जाणून घेऊयात.

भारतात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ८१ रुपयांवरून पुन्हा ८३ रुपयांवर पोहोचला आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होताना पाहायला मिळतो. अशात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे फेड पॉलिसी रेट (Fed Policy Rate) . यूएस फेड रिझर्व्हचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये पॉलिसी रेटमध्ये (Policy Rate) वाढ झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीला मोठा आधार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *