महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ जानेवारी । पुण्यात शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा! CBSC बोर्डच्या तीन शाळा बोगस शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. पुण्यात 3 हून अधिक सीबीएससी माध्यमाच्या शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत.
एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत.