महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ जानेवारी । दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन झाले आहे. माध्यमतज्ञ, अभिनेते, लेखक अशी ओळख असलेले विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 10 जुलै 1939 रोजी त्यांचा जन्म झाला होता.मुंबईतील मुलुंड पूर्व येथे विश्वास मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
विश्वास मेहेंदळे हे दूरदर्शन मुंबईचे पहिले वृत्तनिवेदक होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याची धुराही त्यांनी सांभाळली आहे. 18 हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय अनेक नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. विश्वास मेहेंदळे सिम्बोयसीस इ्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संस्थापक आहेत.