महाराष्ट्र 24 – पिंपरी – लक्ष्मण रोकडे – राज्यातील ८० टक्के शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, तसेच भरती टप्या टप्याने न करता केंद्रीय पध्दतीने प्रसिध्द करावी. तसेच सुमोटो याचिका मध्ये दिलेल्या रोडमॅप प्रमाणे TAIT ची तारीख जाहिर करण्यात यावी.
राज्यात शिक्षकांची ३५ हजार पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्याबाबत मा. शालेय शिक्षण मंत्री यांनी हिवाळी अधिवेशनात ८० टक्के रिक्त पदे टप्या टप्याने भरण्यात येणार असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था/ महानगरपालिका/नगरपालिका/ खाजगी आस्थापनांच्या शाळेवर ६० हजार पेक्षा जास्त जागा रिक्त असून रिक्त पदामुळे ग्रामीण क्षेत्रातील विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच
गेल्या ०५ वर्षापासून रिक्त पदे भरण्यात आलेली नसून ८०टक्के रिक्त पदे भरण्यात यावीत. १० नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयातील मुद्दा क. ५, या अन्वये विविध टप्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी
शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिराती नुसार त्याचा अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील. व मुद्दा क. ४ नुसार शिक्षण अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी
नंतर पद भरतीसाठी आस्थापनेनुसार ०३ महिन्यांतून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिरात देण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू सदर निर्णय हा उमेदवारांच्या हिताचा नाही जर एकदा उमेदवार प्राथमिक पदासाठी पात्र ठरल्यास व त्यानंतर तीन महिन्याने नविन आस्थापनाची जाहिरात आल्यास त्या ठिकाणी त्याची निवड माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक वर झाल्यास तो पहिली आस्थापना सोडून नविन आस्थापनेवर जॉईन
होईल त्यामुळे पहिल्या आस्थापनावर जागा रिक्त राहील असे प्रकार होण्याची शक्यता असल्याकारणाने या निर्णयावर पुर्नविचार करावा व सदर मुद्दा रद्द करण्यात यावा.
तसेच संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद नगरपालिका/ महानगरपालिका आणि कटक मंडळ यांच्या शाळांची बिंदू नामावली अदयावत करून एकूण रिक्त जागा जाहिर कराव्यात.असे उपोषन कर्त्यांनी सांगीतले या वेळी अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष संदिप कांबळे, सचिव प्रशांत शिंदे, सहसचिव पूनम पाटील, सरचिटनिस श्रीकांत जाधव, संघटक अनिल गवळे,निलिमा मागंले, रेणूका गायकवाड (महाले), प्रविण शेळके व इतर सदस्य उपस्थित होते.