खिशाला कात्री ! पुण्यात CNG गॅस महागला, जाणून घ्या नवीन दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ जानेवारी । आधीच महागाईचे चटके सहन असताना पुणेकऱ्यांच्या खिशाला आणखी आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात सीएनजी दरात प्रति किलो मागे एक रुपयांची दरवाढ झाली असून आता जिल्ह्यात सीएनजी ९३ रुपये प्रति किलो या नवीन दराने मिळणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पुणे आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या दरात सहा रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

दरम्यान, पुणेव्यतिरिक्त गुजरातमध्येही आजपासून सीएनजीच्या दरात वाढ जाहीर जाहीर आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडने गुजरातमध्ये सीएनजीच्या (नैसर्गिक गॅस) किमतीत १ रुपये प्रति किलोने दरवाढ केली आहे. नवीन किमती सोमवारपासून म्हणजेच ९ जानेवारी २०२३ पासून लागू झाल्या आहेत. वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत फेडरेशन ऑफ गुजरात पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद ठक्कर यांनी गॅसची किंमत ७९.३४ रुपयांवरून ८०.३४ रुपये प्रति किलो करण्याचे जाहीर केले.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गुजरात गॅसने सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या (पीएनजी) किमतीत ३.५ रुपयांनी वाढ केली होती. १ किलो गुजरात गॅस सीएनजीची किंमत आता ७८.५२ रुपये तर पीएनजीची किंमत ५०.४३ SCM (स्टँडर्ड क्यूबिक मीटर) वर गेली आहे.

इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन
अलीकडेच अदानी टोटल गॅसला आठ शहरांमध्ये- दिल्ली, मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, पुणे आणि सुरत- या शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यास हिरवा कंदील मिळाला. या शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासोबतच कंपनी चाचणी, कमिशनिंग, त्याचे संचालन आणि देखभालीची कामेही करणार आहे. कंपनीने अहमदाबादमध्ये पहिले ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारून क्षेत्रात प्रवेश एन्ट्री घेतली आहे. कंपनीचे म्हटले की देशात १५०० ईव्ही चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क उभारण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

अदानी गॅस ही अदानी समूहाची एक कंपनी असून त्याचे मालक गौतम अदानी आहेत, जे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानी गॅसची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली आणि २०२१ मध्ये त्याचे नाव बदलून अदानी टोटल गॅस, असे करण्यात आले. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय एनर्जी कंपनी टोटलने अदानी गॅसचे ३७ टक्के शेअर्स खरेदी केले. देशातील अनेक राज्यांमध्ये अदानी पीएनजी गॅसचा पुरवठा करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *