Amit Deshmukh: ‘अडीच वर्षात तीन सरकार बदलली, चौथं कधीही येऊ शकेल’ … भाजप प्रवेशावर अमित देशमुखांचे सूचक वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ जानेवारी । काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. यापुर्वीही अनेकदा अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेवर अखेर अमित देशमुख यांनी मौन सोडत भाजपला चांगलच ठणकावलं आहे. ( Maharashtra Politics Amit Deshmukh first reaction rumors about BJP joining)

राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत ठेवण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हंटलेलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

काय म्हणाले अमित देशमुख?

‘अडीच वर्षात तीन सरकार बदलली, चौथं कधीही येऊ शकेल’, असं सूचक वक्तव्य देशमुख यांनी केलं आहे. अरे ही पाच वर्ष खरंच चमत्कारीच राहिली. आता जे सुरु आहे ना, ते तिसरं सरकार सुरु आहे. पहिलं अडीच दिवसांचं, दुसरं अडीच वर्षांचं, आणि आता हे तिसरं सुरु आहे. चौथं कधीही येऊ शकेल. काहीही सांगता येत नाही.

मला तुमच्या घरी या म्हणताय. तुम्ही स्वगृही यावं, असं जर मी म्हणालो तर तेच संयुक्तिक ठरेल. अस प्रत्युत्तर अमित देशमुख यांनी दिले आहे.

तसेच, कितीही वादळं आली, किती वारे आले तरी वाडा तो तिथेच होतो. तसंच कितीही वादलं आली तरी लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहणार. असा शब्दात अमित देशमुख यांनी सुनावलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *