टू व्हीलरची सेवा बंद करण्याचे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ जानेवारी । महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे रिक्षा फेडरेशनने आपले म्हणने न्यायालया मध्ये मांडला होते. या निर्णयाचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकरांचे नेते बाबा कांबळे यांनी स्वागत केले असून ते आज न्यायालयांमध्ये उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले आम्ही रस्त्यावरची लढाई जिंकली पुण्यामध्ये रिक्षा बंद सारखं मोठे आंदोलन झालंआता न्यायालयात देखील आम्ही जिंकलो आहे रिक्षा चालक मालकांचा विजय आहे शेवटी न्याय मिळाला आम्ही न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतो.

पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे विजय ढवळे सर्वसामान्य रिक्षा चालक आप्पा हिरेमठ, संतोष नेवासकर, सचिन रसाळ आधी रिक्षा चालक देखील मोठ्या संख्येने न्यायालया मध्ये उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *