महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ जानेवारी । रिक्षाचालकांच्या पोटावर पाय देणारी बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सीच्या सेवेला कोर्टात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जोरदार आव्हान देण्यात आले. त्यामुळे रॅपिडोची बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा बंद झाली, त्यामुळे रिक्षाचालकांकडून पेढे भरवून, फटाके, ढोल ताशा वाजवून पुष्पगुच्छ देत मावळा टोपी परिधान करून आरटीओ डॉ अजित शिंदे, मोटर वाहन अभियोगता शारदा वाडेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी तसेच रिक्षा पंचायतचे नितीन पवार, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाबा कांबळे, बघतोय रिक्षावाला रिक्षा संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर व रिक्षाचालक उपस्थित होते.