![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ जानेवारी । भारतातील घाऊक किंमतीवर आधारित (Wholesale Price Index) महागाई दर डिसेंबर 2022 मध्ये 4.95 टक्क्यांवर घसरला आहे. घाऊक महागाई दर फेब्रुवारी 2021 नंतर सर्वात खालच्या पातळीवर गेला आहे. अन्नपदार्थ आणि कच्च्या पेट्रोलियमच्या किंमती कमी झाल्यामुळे महागाई दरात घसरण झाली आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज (दि.१६) एका निवेदनाद्वारे दिली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये महागाईच्या दरात झालेली घसरण प्रामुख्याने अन्नपदार्थ, खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न उत्पादने, कापड आणि रसायने आणि रासायनिक उत्पादने यांच्या किमतीतील घसरणीमुळे झाली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
घाऊक किंमत निर्देशांक (WPI)- आधारित महागाई दर नोव्हेंबर 2022 मध्ये 5.85 टक्के आणि डिसेंबर 2021 मध्ये 14.27 टक्के इतका होता. डिसेंबर 2022 मध्ये खाद्य पदार्थांचा महागाई दर (-)1.25 टक्के होता. तर इंधन आणि ऊर्जामध्ये तो 18.09 टक्के होता. या महिन्यात उत्पादित उत्पादनांचा महागाई दर 3.37 टक्के होता, असे निवेदनात म्हटले आहे.
The annual rate of inflation based on all India Wholesale Price Index (WPI) falls to 4.95% for December 2022 against 5.85% recorded in November 2022: Ministry of Commerce & Industry pic.twitter.com/1tkXSqGf97
— ANI (@ANI) January 16, 2023
