महाराष्ट्र 24 : दिनांक 16 जानेवारी
प्रतिनिधी अजय विघे
कोपरगाव- गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी अनोख्या पध्दतीने गांधीगिरी करत कोपरगाव शहर व बेट भागाला जोडल्या जाणाऱ्या मौनगिरी सेतु पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून मागणी केली आहे. सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातून वाहणान्या पवित्र अशा गोदावरी नदी व शहर व बेट भागाला जोडला जाणारा महत्वाचा दुवा असलेल्या राष्ट्रसंत जनार्धन स्वामी (मौनगिरी सेतू वर मोठया प्रमाणात लहान मोठे खड्डे पडले असून या पुलावरील पडलेल्या खड्यात गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे. यांनी गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत या पुलाची लवकरात लवकर पालिका प्रशासनाने डागडुजी करून द्यावी अशी मागणी करत शहरातील सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित येवून हा गोदावरी नदी वरील लहान पूल वाचविला पाहिजे त्यासाठी प्रशासनाला भेटून या पुलाची डागडुजी कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन ढाकणे यांनी मंगळवार दि १० जानेवारी २०२३ रोजी गांधीगिरी आंदोलना प्रसंगी केले आहे.
“शहरातील सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित येवून हा गोदावरी नदी वरील लहान पूल वाचविला पाहिजे त्यासाठी प्रशासनाला भेटून या पुलाची डागडुजी कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन ढाकणे यांनी केले.”
यावेळी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ
या प्रसंगी ढाकणे यांनी बोलताना सांगितले की, कोपरगाव शहरातील गोदावरील नदी वरील बेट भागाला जोडणारा महत्वाचा दुवा समजला जातो मात्र या पुलावर ठिकठीकाणी खड्डे पडलेले असून त्या खाड्यातून कॉक्रीट मधील गज उपड़े पडल्याने वाहनचालकांना तसेच शाळा, कॉलेज मधील विद्याथ्यांना व पायी प्रवास करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असून या मुळे अपघाताला निमंत्रण दिले जात असल्याचे चित्र सध्या या लहान पुलावर पहावयास मिळत आहे अनेक संघर्ष आंदोलन करून हा पूल बांधण्यात आला मात्र या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची येजा सुरु असल्याने पुलावरील खाड्यांमध्ये दिवसेंदिवस मोठी भर पडत असून त्यातील कॉक्रीट गज आता मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या पुलाची डागडुजी करावी ही मागणी करत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुलावर पडलेल्या खडयात गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकत अनोख्या पध्दतीने गांधीगिरी आंदोलन केले.