![]()
महाराष्ट्र 24 – दि. 16 जानेवारी
प्रतिनिधी अजय विघे
शिर्डी सिन्नर महामार्गावर शुक्रवार दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास पाथरे गावां जवळ प्रवासी खाजगी बस व ट्रकचा भीषण अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू होऊन ३५ जण जखमी झाले होते याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला घडलेल्या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आरटीओ व पोलीस प्रशासनाने याबाबत सदर घडलेले ट्रक व खाजगी ट्रॅव्हल बस ही दोन्हीही वाहने सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वावी पोलीस स्टेशन येथे दोन्ही वाहने नेऊन चौकशी केली असता तेथे तपासा दरम्यान मोठे गौडबंगाल निदर्शनास आले व चक्क पोलीस देखील चक्रावले एकाच खाजगी ट्रॅव्हल बसला चक्क एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे नंबर असल्याचे दिसून आले वरच्या बाजूला एम.एच ०४ एफके २७५१ तर खालच्या नंबर प्लेटवर एम.एच ०४ एफके २७८१ असे दोन्ही नंबर्स ठळक अक्षरात दिसून येत होते त्यामुळे या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा नेमका नंबर कोणता याबद्दल शंका आल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने नमूद घटना वरिष्ठांमार्फत प्रादेशिक परिवहन विभागाला कळवली त्यानुसार आरटीओ विभागाचे अधिकारी अतुल गावडे यांनी प्रत्यक्ष वाहने उभे केलेल्या वावी पोलीस स्टेशनला आपल्या फौजपाट्यासह भेट दिली असता सदर बसची तपासणी करून तसेच ऑनलाईन तपासणी केली असता सदरची प्रवासी वाहतूक करणारी बस पनवेल आरटीओने ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे जर असे प्रकार जर होत असतील तर आरटीओ व पोलीस यंत्रणाकडे संशयाची सुई ऑटोमॅटिक जाते जर खाजगी बस प्रवासी वाहतूक करताना पोलीस प्रशासनाने या बसचे कागदपत्र इन्शुरन्स तपासणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष का केले ? या अपघातात १० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आता तरी झोपलेले प्रशासन जागे होऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बस गाड्यांची तपासणी करणार का ? की अजून काही अघटीत घटना घडण्याची वाट पाहणार का ? असा प्रश्न घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला विचारला आहे तसेच जखमी झालेल्या प्रवाशांकडून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कुठलेही वैद्यकीय बिल घेतले नसल्याचे यशवंत रुग्णालयाचे डॉ. संदीप मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले तर जखमी रुग्णांना त्यांच्या सोयीनुसार शिफ्ट केले असून तर काहींना डिस्चार्ज देण्यात आला आहे सदर घटनेची वावी पोलीस स्टेशनला १७ /२०२३ भा.द.वी. कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ४२७, सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १८७, १३४, २७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सागर. बी. कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.