महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे ।१९ जानेवारी । पिंपरी । काल नेहरूनगर-विठ्ठलनगर मधील काही भागात साधारण 12 तासंपासून वीज पुरवठ्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळें वीजपुरवठा खंडित होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांनी तातडीने MSEB कार्यालयाशी संपर्क साधून वीजपुरवठा कर्मचारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रसंगीखोदकाम करून विजपुरवठ्यातील तांत्रिक अडचण दूर करून वीजपुरवठा सुरळीत केला.नागरिकांनी नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांचे कार्यतत्परतेबद्दल आभार मानले.