महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – लातूर – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – उदगीर शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील १७ जणांचे स्वॅब आज तपासण्यात आले. त्यात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, ४ निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल प्रलंबित आहेत. लातूर शहरातील ७ जणांचे स्वॅब तपासण्यात आले असून, ते सर्व निगेटिव्ह आहेत.
लातूर जिल्ह्यातील २४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते़ त्यात उदगीरचे १७ तर लातूरचे ७ होते. दरम्यान, उदगीरमधून एकाच दिवशी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे, . आतापर्यंत उदगीरमध्ये मयत महिलेसह ३१ रूग्ण आढळले होते. त्यात दहाची भर पडून एकूण उदगीरची रूग्णसंख्या ४१ झाली आहे. त्यातील २१ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेलेले आहेत. प्रारंभी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर १९ जणांवर उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.