देशाला स्वावलंबी- आत्मनिर्भर बनण्यासाठी केंद्र सरकारने चीनवर आयात निर्यात निर्बंध घालावेत:

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी.के. महाजन – भारताला आत्मनिर्भर – स्वावलंबी करण्यासाठी , केंद्र सरकारने सर्व प्रथम चीन वर आयात निर्यात निर्बंध घातले पाहीजेत. काय होईल ते होईल हा निर्णय सरकारने घेतलाच पाहिजे, नाहीतरी अशीही भारतीय अर्थव्यवस्था लयाला गेली आहे. हिच योग्य वेळ चीनी वस्तुंना कायमची तिलांजली द्यायची. स्वदेशी वस्तूंपेक्षा चिनी वस्तू स्वस्त मिळाल्या तर भारतीय लोक चिनी वस्तू घेतीलच कारण व्यावहारिक दृष्टया ते योग्यच आहे.

दुसरी बाजू विचारात घेतली तर भारतीय उद्योजकां ना स्वदेशी वस्तू… चिनी वस्तू पेक्षा स्वस्त उत्पादन तयार करने आजतरी शक्य नाही.त्या मुळे चीन वर आयात निर्यात निर्बंध घालने कठीण वाटत असले तरी सरकारने सदर निर्णय घेतला तर देशातील संपुर्ण जनता ह्या निर्णयासाठी सरकारला पाठिंबा देईल , कारण सदर निर्णय हा देश हिताचा आहे. भारतीय स्वावलंबी बनवण्याचा असेल तर भारताचा आर्थीक विकास जा झाला पाहिजे. आणी भारतीय स्वदेशी वस्तुंचा वापर वाढला तरच भारताचा आर्थीक विकास होईल.

तरच देशाचा GDP. वाढेल……. भारत आत्मनिर्भर बनवण्या साठी संरक्षण क्षेत्रात FDI . ला 74 % पर्यंत गुंतवणूक करण्या साठी परवानगी देण्याचा निर्णय सरकारला योग्य वाटतो, ह्या निर्णयाने भारत आत्मनिर्भर होईल अस वाटत असेल तर चीन वर आयात निर्यात निर्बध घालणे का योग्य वाटत नाही. चीन वर आयात निर्यात निर्बंध घालने आंतरराष्ट्रीय धोरणात बसत नसेल किंवा आपल्याही काही कंपन्या चिन मधे उद्योग करतात ,त्यांना अडचण येवू नये म्हणून योग्य वाटत नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव सध्याच्या घडीला ते निर्णायक वाटत नसेल तर चिनी वस्तूंवर जास्तीत जास्त आयात शुल्क तरी आकारावे जेणे करुन चिनला ते परवडणार नाही. म्हणजे आपल काम ही होइल. आणी आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचण पं होणार नाही….. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *