Income Tax: वार्षिक १२ लाखांची कमाई, तरीही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही; पहा कसं ते

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० जानेवारी । सर्वसामान्य नागरिकांपासून बड्या उद्योगपतींचे आगामी अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मागील ९ वर्षांची प्रतीक्षा संपवतील, असा अनेक करदात्यांना अपेक्षा आहे. यंदा अर्थसंकल्पात करदात्यांना प्राप्तिकरात दिलासा मिळण्याची शक्यता असून या आशेवर सर्वसामान्य करदाते १ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळो किंवा नाही, पण आज आम्ही तुम्हाला त्या फॉर्म्युल्याबद्दल सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर सूट मिळवू शकता. जर तुम्ही तुमच्या कमाईचे योग्य नियोजन केले तर तुम्ही १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत मिळवू शकतात.

असं करा नियोजन
नोकरदार वर्गाचे अनेक लोक शेवटच्या क्षणी कर बचत करण्याची घाई करतात पण करबचतीचे नियोजन पहिल्या दिवसापासून, पहिल्या आठवड्यापासून केले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच कर बचतीची योजना आखली पाहिजे. तुमच्या पगाराची योग्य अशी गुंतवणूक करा, सर्व कर कपातीची, कर सवलतींची अचूक गणना केल्यावर तुम्हाला १२ लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर शून्य कर भरावा लागेल, म्हणजे तुम्ही तुमच्या कमाईवर पूर्ण कर वाचवू शकता.

कुठे-कुठे मिळते सूट
प्राप्तिकर विभाग तुम्हाला पगारातून अनेक कपातीची सूट देते, जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. पगारदार वर्गाला ५० हजार रुपयांपर्यंत मानक वाजत मिळते, तर तुम्ही आयकर कलम ८०सी अंतर्गत १.५ (दीड) लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूटचा लाभ मिळवू शकता. तसेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत ८०सीसीडी अंतर्गत गुंतवणुकीवर तुम्हाला ८० हजारांपर्यंत ८०डी अंतर्गत आरोग्य विम्यावर कर सूट मिळू शकते.

१२ लाखांच्या उत्पन्नावर कर बचत कशी?
जर तुमचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये आहे, तर सर्वप्रथम तुम्ही ५०,००० रुपयाची स्टँडर्ड डिडक्शन काढून टाका. म्हणजे आता तुमचा पगार ११.५० लाख रुपये झाला आहे. यानंतर तुम्ही आयकर कलम ८०सी अंतर्गत दीड लाखांची कर सूट मिळवू शकता. म्हणजेच आता तुमच्या पगारात १० लाख रुपयांची बचत झाली आहे. तसेच जर तुम्ही १३ ते १५ हजार भाडे देत असाल तर घरभाडे भत्त्याचा डाव करत तुम्हाला किमान १.५ लाखांची सूट मिळू शकते. म्हणजे आता तुमचे उत्पन्न ८.५ लाख रुपये होईल. त्यानंतर प्रवास भत्त्यावर ८०,००० रुपयांची वजावट घेत तुमचे करपात्र पगार ७.७ लाख रुपये करू शकता. तर २० हजार रुपयांपर्यंत प्रतिपूर्तीचा दावा केल्यावर तुमचे करपात्र उत्पन्न आता ७.५ लाख रुपये होईल.

योग्य नियोजन करून कर वाचवा
कन्व्हेयन्स रिइम्बर्समेंटसह तुम्ही करपात्र उत्पन्नातून १.६ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न वजा करू शकता. तसेच जर तुमची मुले शिक्षण घेत असतील, तर तुम्ही जर मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह भत्ता यावर फक्त १२,६०० रुपायीच बचत करू शकता तर तुमचे करपात्र उत्पन्न ५,०४००० रुपयांपर्यंत पोहोचते. तसेच जर तुम्ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत खाते उघडल्यास तुमची निवृत्ती तर सुरक्षित होईलच शिवाय तुमची कर बचत करू शकता. आता तुमचे करपात्र उत्पन्न ५ लाखांच्या खाली पोहोचले असेल. लक्षात घ्या की पाच लाखांपर्यंत करपात्र उत्पन्नावर सरकारकडून २.५ लाख रुपयांपर्यंतची कर सवलत दिली जाते. म्हणजे तुमचा कर शून्यावर पोहोचला आहे. अशा प्रकारे, योग्य नियोजनासह गणना करून तुम्ही तुमचा आयकर शून्यावर आणू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *