पंकजा मुंडेंची बदनामी करणारा गट भाजपमध्येच ; बावनकुळेंची कबुली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२१ जानेवारी । पंकजा मुंडे यांची आणि पक्षाची बदनामी करणारा गट भाजपमध्येच असल्याची जाहीर कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते बीडमध्ये बोलत होते. बीडमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यावरून पत्रकारांनी बावनकुळे यांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, “भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं, ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत.” पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत, त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत; त्यामुळे त्यांना नंतर बोला मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *