भोसरीत मेडीकव्हर हॉस्पिटल्सचे ३०० बेड्सचे अद्ययावत मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन.

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । लक्ष्मण रोकडे ।२२ जानेवारी । पुणे । मेडीकव्हर ग्रुप हे देशभरातील सर्वात वेगवान आरोग्य सेवेत आपले जाळे विस्तारणारे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. पुण्यातील भोसरी येथे मेडिकव्हरचे ३०० बेड्सची क्षमता असलेले अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री, महाराष्ट्र राज्य, डॉ. अमोल कोल्हे (खासदार), श्रीरंग बारणे (खासदार), डॉ. सुजय विखेपाटील, (खासदार,अहमदनगर), महेश लांडगे (आमदार), फ्रेडरिक स्टेनमो (अध्यक्ष, मेडीकव्हर ग्रुप), डॉ. अनिल कृष्णा, (अध्यक्ष, मेडीकव्हर हॉस्पिटल्स, इंडियाचे, डॉ. प्रभाकर कोरे, अध्यक्ष, केएलई सोसायटी तसेच डॉ. विश्वजीत कदम, (भारती विद्यापीठाचे कुलगुरू), पी. हरी कृष्ण, कार्यकारी संचालक, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथील केएलई सोसायटीचे अध्यक्ष महांतेश एस. कौजलगी आदी मान्यवर उपस्थित होते.

भोसरी येथील रुग्णालयात उच्च प्रतीचे कॅथ लॅब, १६० स्लाइस कार्डियाक सीटी, 3टी कार्डियाक एमआरआय, मॅनोमेट्री, पीएच मेट्री, ४० अतिदक्षता विभाग, १४ एनआयसीयू आणि 8 पीआयसीयू बेड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह 7 सुसज्ज ऑपरेशन थिअटर या ठिकाणी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, सर्व प्रकारच्या आणि सर्वच वयोगटातील रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी १५ प्रसूती बेड्ससह किडनी विकारग्रस्तां साठी १२ खाटांचे डायलिसिस युनिट आणि प्रगत सुविधा आणि उपकरणे देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पुण्यात उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करुन संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम नेटवर्क प्रस्थापित करताना आम्हाला आनंद होत आहे. मेडीकव्हर ग्रुप गुणवत्ता राखून आणि परवडणा-या दरात आरोग्य सेवा पुरवत असून युरोपियन प्रणालीचे पालन करत भारतात आरोग्य सुविधा देत असल्याची माहिती सीईओ फ्रेडरिक स्टेन्मो, अध्यक्ष, मेडिकव्हर ग्रुपचे यांनी दिली. पुण्यातील भोसरी येथे नव्याने सुरु झालेल्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सची ही भारतातील २४ वी शाखा आहे. या कार्यक्रमात बोलताना, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भारतीय अध्यक्ष आणि वैद्यकीय संचालक डॉ. जी अनिल कृष्णा सांगतात की, मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा भारतातील विस्तार पाहून आनंद होत आहे. भोसरीतील रहिवाशांना उच्च उत्तमोत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्याचा या संस्थेचा मानस आहे. हे रुग्णालय भोसरी आणि आसपासच्या भागातील रुग्ण आणि समाजाच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *