Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची लाट ; वाचा हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ जानेवारी । 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर (Cold Weather) वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं (Meteorology Department) वर्तवला आहे. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. 20 जानेवारीनंतर मात्र, थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात थंडीचा जोर कायम
राज्यात थंडीचा जोर (Cold Weather) कायम आहे. मात्र, काही भागात किंचित थंडी कमी झाली आहे. त्यामुळं काही भागात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही भागात अद्यापही हुडहुडी कायम आहे. आजपर्यंत म्हणजे 26 जानेवारीपर्यंत थंडी वाढणार नसल्याचा अंदाज हवामान विभागानं (Meteorological Department) वर्तवला होता. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात थंडी अद्यापही कायम आहे. राज्यातील इतर भागात थंडीचा (Cold) जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळं नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. ज्या ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे, त्या ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.

एकीकडे राज्यात तापमानात वाढ होत असताना नागरिकांना दिलासा मिळत आहे मात्र दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) अजूनही थंडीचा कडाका (Cold Wave) कायम आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं त्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *