Santosh Bangar : संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ! ‘या’ प्रकरणात गुन्हा दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ जानेवारी । शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. अशातच पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर यांचा मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला. हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.

दरम्यान या मारहाण प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर महाविद्यालयातील पाच अधिकाऱ्यांवरही या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. डॉक्टर अशोक उपाध्याय असे आमदार बांगर यांनी मारहाण केलेल्या प्राचार्याचे नाव आहे. उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केली. मारहाणीची ही घटना १८ जानेवारीला घडली असल्याचं सांगितलं जातं आहे. या घटनेवरून प्रचार्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फक्त आमदार बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. वारंवार आमदार कायदेमंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायंदळी तुडवतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *