Pathaan Box Office Collection: अवघ्या तीन दिवसांत ‘पठाण’ने केली इतकी कमाई

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ जानेवारी । बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडत नवे रेकॉर्ड्स स्थापित केले आहेत.

तब्बल चार वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन केलेल्या किंग खानची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे.शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचे केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळाल्याने त्यांचे चाहते जाम खुश आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ने अवघ्या तीन दिवसांत वर्ल्डवाईड 220 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतात 34. 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाने भारतात अवघ्या तीन दिवसांत एकूण 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.पठाण चित्रपट शंभर पेक्षा अधिक देशांमध्ये आणि 2500 पेक्षा जास्त स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे.शाहरुख खानचा हा चित्रपट आणखी काय कमाल करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *