बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, 30-31 जानेवारीला सुरू राहतील बँका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ जानेवारी । बँक संपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 30 आणि 31 जानेवारी रोजी होणारा संप कर्मचाऱ्यांच्या वतीने स्थगित करण्यात आला आहे. केंद्रीय स्तरावर फाइव्ह डे वीकसह अन्य विषयांवर चर्चा झाल्यानंतर संप रद्द करण्यात आला आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत संप स्थगित करण्यात आला. बँक एम्प्लॉईज युनियनचे अखिल भारतीय सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी ही माहिती दिली आहे. या दिवसात बँकांचे कामकाज सामान्य दिवसांप्रमाणे सुरू राहणार आहे.

बैठकीमध्ये काय झाले

बँक युनियनचा हा संप 30 आणि 31 जानेवारीला होणार होता. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी निदर्शने देखील करण्यात आली होती. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे संयुक्त सचिव डीएन त्रिवेदी यांनी सांगितले की, शुक्रवारी सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर 30 आणि 31 तारखेला बँका बंद राहणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

-बँकिंगचे काम पाच दिवसांत झाले पाहिजे.

-पेन्शन अपडेट करावी.

-एनपीएस रद्द करण्यात यावे.

-पगारवाढीसाठीही चर्चा व्हायला हवी.

-सर्व कॅडरमध्ये भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी.

 

सरकारी सुट्टीमुळे शनिवार आणि रविवारी बँका बंद राहणार आहेत. 30 आणि 31 जानेवारीला संप झाला असता तर सलग चार दिवस बँका बंद राहिल्या असत्या. त्यामुळे ग्राहकांची अनेक कामे रखडली असतील. मात्र आता संप मागे घेण्यात आल्यामुळे बँकांची कामे नियमितपणे सुरु राहणार आहेत.

31 जानेवारीला आयबीएसोबत बैठक होणार आहे
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन बँक्स असोसिएशनने 31 जानेवारी रोजी युनियनसोबत बैठक घेण्याचे मान्य केले आहे. शुक्रवारी झालेल्या सामंजस्य बैठकीत पाच दिवसीय बँकिंग, पेन्शन अपडेशन आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे या तीन मुद्द्यांवर 31 जानेवारी रोजी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *