महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३१ जानेवारी । सुनील आढाव । फायनान्स आणि कार्पोरेट विश्वात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दिमाखदार गौरव सोहळा नुकताच पार पडला. वुई हॉटेल चिंचवडचे नलिनी व प्रविण मनोहर शिर्के तसेच स्टायलो युनिसेक्स सलुनच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता निगडी-भोसरी रोडवरील थरमॅक्स चौकातील वी हॉटेलमध्ये करण्यात आले होते. यावेळी पर्सनल फायनान्स अॅडव्हायझर पृथ्वीराज यांना आनंद मेडिकल फाऊंडेशनचे, डॉ. अनिल काळे यांच्या हस्ते लाईफ इन्शुरन्समधील जागतीक नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील तसेच क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.पुरस्कारार्थी पृथ्वीराज यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मान्यवरांकडून सदिच्छा देण्यात आल्या.
पुरस्कार सोहळ्यास यांची प्रामुख्याने उपस्थिती…
यावेळी सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उल्हास चिंदनशिवे, अध्यक्ष डॉ. अनिल काळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीपसिंह परदेशी, रणजित शिंदे, व्यंकटेश वर्धन, लिनाक्षी आंबोणे म्हणून उपस्थित होते. तसेच या पुरस्कार गौरव सोहळ्यास आरटीडीचे डीवायएसपी चतुर्भुज काकडे, उद्योजिका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा मोनिका जाधव,पुणे न्यायलयाची वरिष्ठ वकील दिलीप शिंदे, महाराष्ट्र शासन वन विभागाच्या हरित सेवा सदस्य विक्रांत पवार, यांची विशेष उपस्थिती लाभली.