रिक्षा चालकांसाठी मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० जानेवारी । रॅपिडोच्या विरोधात हायकोर्टमध्ये सुरू असलेली लढाई जिंकल्यानंतर रॅपिडो कंपनीने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते आणि आता रिक्षा चालकांना सर्वोच्च न्यायालयामध्ये या विरोधातला संघर्ष करावा लागणार आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात याबाबत पहिली तारीख होती आणि आज न्यायालयात नेमकं काय घडतंय याची उत्सुकता संपूर्ण शहरातील रिक्षा चालकांना लागलेली होती. परंतु आज न्यायालयात न्यायमूर्तींनी दोन्ही बाजू जाणून घेतल्या आहेत व पुढील 2 दिवसांनंतरची तारीख देण्यात आली असल्याची माहिती, ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली,

महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीने बाबा कांबळे तर पुणेरीक्षा फेडरेशनच्या वतीने आनंद तांबे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरवेशन याचिका दाखल केले असून रिक्षा चालकांची टॅक्सी चालकांची बाजू ऐकल्याशिवाय कोणत्या निर्णय घेऊ नये अशी विनंती याचिका दाखल केली आहे महाराष्ट्र मध्ये 22 लाख ऑटो टॅक्सी चालक-मालक आहेत तर देशभरामध्ये 23 कोटी ऑटो टॅक्सी व परमिट धारक चालक-मालक आहेत त्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणारा हा निर्णय आहे यामुळे आमचे हक्क अधिकार अबाधित राहावेत यासाठी आमचे म्हणणे ऐकले जावे असे विनंती इंटरवेशन याचिकेमध्ये केली असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिले,

मुंबई उच्च न्यायालय मध्ये आम्हाला न्याय मिळाला न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला याच प्रकारे आज आम्ही दिल्लीपर्यंत या प्रश्नावर ती लढत असून सुप्रीम कोर्टातील मा.न्यायाधीश देखील आम्हाला न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे असे आनंद तांबे म्हणाले,

त्यामुळे आता रॅपिडो वरील बंदी सर्वोच्च न्यायालयामध्ये कायम राहणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडलेला आहे. त्यामुळे संपूर्ण रिक्षाचालकांना आता पुढील दोन दिवसानंतर नेमकं न्यायालयामध्ये काय होते याची उत्सुकता लागलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *