![]()
महाराष्ट्र 24 – प्रतिनिधी अजय विघे| येवला : तथागत गौतम बुद्धांचा पवित्र अस्थिकलश घेऊन निघालेली थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ व उपासकांची पदयात्रा 02 फेब्रुवारी रोजी दुपारी 12-00 वाजता अंदरसुल वरुन मुक्तीभूमी नगरी येवला येथे पोहोचणार असून शहरात ठिकठिकाणी ‘या पदयात्रेचे स्वागत व अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक उपासक, उपासिकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. ही धम्म पदयात्रा परभणीहून निघाली असून चैत्यभूमी (दादर) मुंबई येथे जाणार आहे. यात ११० थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्खू तसेच भारतातील भिक्खु संघ, उपासक आदींचा सहभाग आहे. ही पदयात्रा 02 फेब्रुवारी रोजी गुरुवारी येवल्यात दाखल होणार असून 02 फेब्रुवारी दुपारी जाळगाव नेऊर या ठिकाणी रवाना होणार आहे. शहरातील उपासक, उपासिकांनी बुद्धांच्या अस्थीचे दर्शन घ्यावे असे आवाहन समस्त नागरिकांनी केले आहे. येवला तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय, नगरसेवक, नगरसेविका शैक्षणिक, पत्रकार, आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते, पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक बंधू भगिनी, उपासक, उपासिका, युवक, युवती आदोनी एकत्र येत स्वागताची जय्यत तयारी सुरु केली आहे.
“तथागत भगवान गौतम बुद्ध अस्थिधातू एक ऐतिहासिक धम्मप्रचारवारसा जन्म इ. स. पू. 563 वर्षे महापरिनिर्वाण इ.स.पू. 483 वर्षे आजपर्यंत थायलंड येथील राजेच थायलंड येथील भिक्खू संघयानी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थिधातू आजही जतन करून ठेवल्या असून ही पवित्र व पावन स्मृती अतिशय पावित्र्य राखून जतन केलेली आहे. हा ऐतिहासिक धम्मप्रचार वारसा तर आहेच पण येवला तालुक्यासाठी सर्वात आश्चर्यकारक व अद्भुत घटनासुद्धा आहे. या अस्थिधातू सुवर्ण कलशा मध्ये तेव्हापासून जतन करून ठेवले आहे हे पिढ्यान् पिढ्या थायलंड भिक्खू संघाकडून प्रचार आणि प्रसारामुळे शक्य झाले आहे. आणि 02 फेब्रुवारी ला येवला तालुक्यात हा अस्थीकलश घेऊन महाधम्म पदयात्रा करत 110 थायलंड भिक्खू संघ दाखल होणार असून प्रत्यक्ष डोळ्यानी तथागत गौतम बुद्धांचे अस्थिधातू येवला वासियांना पाहता येणार आहे तसेच अभिवादन सुद्धा करता येणार आहे.”