दोन वंदे भारत एक्सप्रेस एकत्र! जाणून घ्या कोणत्या राज्याला ही भेट मिळू शकते

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ फेब्रुवारी । देशाला एकाच वेळी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या मिळू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबईत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी येऊ शकतात. भारतीय रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूरपर्यंत चालवता येतील. एकाच वेळी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 16 डब्यांच्या या गाड्यांमध्ये 1,128 प्रवासी प्रवास करू शकतात. महाराष्ट्रात दोन वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. एक ट्रेन मुंबई ते अहमदाबाद आणि दुसरी नागपूर ते विलासपूर अशी आहे. वंदे भारत 200 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. मात्र रेल्वे बोर्डाने त्यांना सध्या 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी दिली आहे. या प्रत्येक ट्रेनची किंमत 110 कोटी रुपये आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) येथून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवू शकतात. दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील. सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईहून दुपारी ३ वाजता आपल्या पहिल्या प्रवासात निघेल, असे मानले जाते. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाडमार्गे शिर्डीला पोहोचेल. तर सोलापूर-सीएसएमटी हा प्रवास सोलापूरहून असेल. सोलापूरहून दुपारी ३ वाजता सुटून कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादरमार्गे सीएसएमटीला पोहोचेल.

सीएसएमटी-साईनगर शिर्डी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन मुंबईच्या सीएसएमटी येथून सकाळी 6.15 वाजता सुटून दुपारी 12.10 वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल. परतीच्या दिशेने ती साईनगर शिर्डी येथून 5.25 वाजता सुटेल आणि 23.18 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. सध्या सीएसएमटी ते साईनगर शिर्डी दरम्यान कोणतीही थेट ट्रेन नाही. दादर ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या ट्रेनला सहा तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस हे अंतर पाच तास ५५ मिनिटांत पूर्ण करेल. ही ट्रेन सीएसएमटी ते कसारा दरम्यान ताशी 105 किमी आणि इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान 110 किमी प्रतितास वेगाने धावेल. त्याचा वेग कसारा ते इगतपुरी दरम्यान ताशी 55 किमी आणि पुणतांबा ते साईनगर शिर्डी दरम्यान 75 किमी प्रतितास असेल. मार्गात दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल.

सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी ६:०५ वाजता सुटेल आणि दुपारी १२:३५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. परतीच्या दिशेने ती सीएसएमटी येथून 4.10 वाजता सुटेल आणि 22.40 वाजता सोलापूरला पोहोचेल. संपूर्ण प्रवास साडेसहा तासांत पूर्ण होईल. सध्या मुंबई ते सोलापूरदरम्यान धावणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस आठ तासांत प्रवास पूर्ण करते. त्यामुळे वंदे भारतच्या प्रवाशांचा दीड तास वाचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, लोणावळा, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबेल. ही ट्रेन लोणावळा ते सोलापूर दरम्यान 110 किमी, सीएसएमटी ते कर्जत दरम्यान 105 किमी आणि कर्जत ते लोणावळा दरम्यान 55 किमी प्रति तास वेगाने धावेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *