नाशिक पदवीधर निवडणूक ; मतमोजणीस सुरुवात, कोण मारणार बाजी ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ फेब्रुवारी । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.28 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत.

विभागातून १ लाख २९ हजार ४५६ पदवीधर मतदारांनी 16 उमेदवार यांचे भवितव्य मतपेटीतून बंद केले आहे. तरी खरी चुरस ही अपक्ष सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यातच पाहायला मिळते आहे. तसे असले तरी शेवटी विधान परिषदेची पायरी कोण चढणार हे आज गुरुवार मतमोजणीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वत्र उत्सुकता असून, त्याचे उत्तर अवघ्या काही तासांत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *