पुण्यात नासाच्या नावाने शेकडो लोकांची कोट्यावधींची फसवणूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ फेब्रुवारी । राज्यात दिवसेंदिवस आर्थिक फसवणुकीचेही अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

रेडिओधर्मी दुर्लक्ष धातू राईस पुलर भाड्यांच्या उत्पादनात गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यात कोट्यावधींना गंडा घालण्यात आला. याबाबत बाबासाहेब रामहरी सोनवणे (वय ५०, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली. यानंतर याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राम गायकवाड (रा. माळवाड, अकलुज, सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ (रा. कारखेल, पुणे) आणि राहुल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

देशभरात अनेक ठिकाणी राईस पुलर या नावाने मोठ्या प्रमाणावर फसवणूकीचे प्रकार आजवर उघडकीस आले आहेत़. आरोपी यांनी संगनमत करुन राईस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी साधु वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला होता. तसेच यामध्ये तुम्ही गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल, असे आमिष दाखवले होते.

यानंतर त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केला. मात्र, त्यानंतर या लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात फसवणूक झालेल्या 100 हून अधिक नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिले. आतापर्यंत पाच ते सहा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *