उमरान मलिकचा 150 kmh वेगाने तुफान चेंडू ; Bail उडून 30 यार्डाच्या बाहेर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ फेब्रुवारी । भारतीय गोलंदाजीची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गोलंदाजांच्या यादीत उमरान मलिक (Umran Malik) हे एक नवं नाव दाखल झालं असून, आपल्या जबरदस्त खेळीने क्रीडा क्षेत्राला आपली दखल घेण्यास भाग पाडत आहे. कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतक्या सातत्याने ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करण्यास जमलेलं नाही. न्यूझीलंडविरोधात तिसऱ्या टी-20 (Ind vs NZ T20) सामन्यात उमरान मलिकने पुन्हा एकदा ही कमाल करुन दाखवली आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium) भारत-न्यूझीलंडमधील तिसरा टी-20 सामना पार पडला. यावेळी भारतीय गोलंदाजाकडून सर्वात वेगाने चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड असणाऱ्या उमरान मलिकने न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेल याला पाचव्या ओव्हरमध्ये तंबूत धाडलं.

उमराने ओव्हरचा पहिलाच चेंडू ताशी 146.8 वेगाने टाकला, हा यॉर्कर खेळण्यात ब्रेसवेल अपयशी ठरला. यानंतर उमरानने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर ब्रेसवेल बाद झाला. हा चेंडू उमरानने तब्बल ताशी 150 किमी वेगाने फेकला होता. चेंडू स्टम्पला लागल्यानंतर बेल अक्षरश: हवेत उडाली. इतकंच नाही तर विकेटकिपर इशान किशन आणि स्लीपला उभ्या सुर्यकुमार यादवच्याही डोक्यावरुन उडून लांब पडली. बेल 30 यार्डच्याही बाहेर गेली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *