महाराष्ट्र 24 -प्रतिनिधी – अजय विघे – येवला – तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चैत्यभूमीच्या दिशेने निघालेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांचा अस्थिकलश धम्म पदयात्रा गुरुवार दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी येवला मुक्तभूमी येथे दुपारी दाखल झाली यावेळी थायलंडचे भंन्ते लॉंग पुंजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ११० भिक्खूचां संघ या धम्म पदयात्रेत सहभागी असून ही धम्मपदयात्रा दररोज २० किलोमीटर पायी चालते २० किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर या धम्म यात्रेचा मुक्काम असतो यादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले उपासक उपासिका याच्यांसह धम्म यात्रेत सहभागी झालेल्या भिक्खू संघ आणि त्यांच्या सोबत असलेल्या उपासक उपासिकांना भोजनाची व्यवस्था करतात तसेच आज या पदयात्रेचे येवला शहरात अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले.
अंदरसुल कडून येवला मुक्तीभूमी कडे जाताना संपूर्ण महामार्गावर उपासक उपासिका यांनी रांगोळी व पुष्प टाकून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी घेऊन जाणारा रथ व पूज्य भिक्खू संघ त्या टाकलेल्या फुलं पुष्पांवरून चालत असताना अनेक जिल्ह्यानंमधून आलेले बौद्ध उपासक उपासिका बाल बालिका या अस्थिकलशाचे पूजन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून तसेच महिलांनी देखील पांढरी शुभ्र साडी परिधान करून हातामध्ये फुल पुष्प घेऊन रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून अस्थी कलशाचे दर्शन घेत होते. हा योग फार दुर्मिळ असा योग असून २५०० हजार वर्षांपूर्वी महानिर्वाण झालेले तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थींचे दर्शन मिळाले आणि अनेकांनी याची देही याची डोळा पहा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिंचा भव्य असा दर्शन सोहळा भारत देशातील उपासक उपासिकांना थायलंड येथील भिक्खू संघाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थींचे दर्शन भारतवासीयांना घडवून दिले त्याबद्दल अनेक भारतवासीयांनी थायलंड येथील भिक्खू संघाचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.
या पदयात्रेच्या माध्यमातून अखंड विश्वाला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या शांती आणि मैत्री बाबतचा संदेश दिला जात आहे “बुद्धम् शरणम् गच्छामि” धम्मं शरणं गच्छामिने” संपूर्ण येवला शहर निनादले तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिकलश एका काचेच्या पेटीत ठेवण्यात आला आहे. हे वाहन विविध रंगाच्या फुलांनी सजवण्यात आलेले आहे. या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी उपासक उपासिकांनी येवला मुक्त भूमी येथे अभूतपूर्व अशी गर्दी केली होती. अंदरसुल कडून येवल्या कडे येतांना उपासक उपासीका बाल बालिका मोठ्या संख्येने या धम्म पदयात्रेत सहभागी झाले होते समता सैनिक दल हे धम्म रथावर लक्ष ठेवून होते. तर स्थानिक पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे कुठेही अडचण निर्माण झाली नाही.
इ.स.वी सन पूर्व ५६३ ते ४८३ च्या काळातील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थीचे पवित्र दर्शनाने खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला दर्शन मिळाले. अशी भावना कोपरगाव येथील दि बुधिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभाचे आर्दश बौध्दाचार्य शांताराम रणशूर,दादासाहेब साबळे रत्नाकर गायकवाड, रमेश गवळी, विजय जगताप, सातपुते नाना, बिपीन गायकवाड उपासकांनी आमच्या प्रतिनिधीकडे बोलून दाखवली आमच्या जीवनातील अविस्मरणीय असा क्षण म्हणून आजचा हा दिवस आमच्या आयुष्यात आल्यामुळे आम्ही फार भाग्यवान आहोत.
अगदी शांततेत पूज्य भिक्खू संघ रस्त्यावर टाकलेल्या रांगोळी व फुलं पुष्पावरून चालत पुढे मार्गक्रमण करत होते त्यांच्यासोबतच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सजवलेल्या रथा मध्ये ठेवलेल्या अस्थी कलशाचे देखील मार्गक्रमण सुरू होते “जगात पाहिलं आणि अंतिम सत्य बुद्धच आहेत” अडीच हजार वर्षापासून जपून ठेवलेल्या तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थी म्हणजे पृथ्वीतलावर जन्मास आलेल्या जिवंत व्यक्तींचा पुरावा आणि ते बघण्यासाठी भव्य धम्मपदयात्रांमध्ये हजारोंचा जनसागर येवला मुक्तभूमी नगरी या ठिकाणी अवतरला.