व्हॉट्सऍपवर प्रायव्हसी हवीय तर हे करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ फेब्रुवारी । फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी धोरणावरून सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी व्हॉट्सअॅप युजर्सचा फक्त काही डेटा फेसबुकवर शेअर केला जातो आणि वापरकर्त्यांना संपूर्ण प्रायव्हसी हवी असेल तर त्यांनी फेसबुकवर खाते न ठेवता व्हॉट्सअॅप वापरावे, असा युक्तिवाद फेसबुकच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात केला आहे.

2016 मध्ये व्हॉट्सअॅप युजर्सचा डेटा फेसबुकला देण्याच्या धोरणाच्या विरोधात दोन विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. हा करार युजर्सच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती केएम जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती सी. टी. रवी कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान व्हॉट्सअॅपने न्यायालयाला सांगितले, व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे कोणते मोबाईल नंबर व्हॉट्सअॅपवर केव्हा आणि कसे नोंदवले गेले. ते ऑपरेट करतात, फक्त त्याची माहिती सामायिक केली जाते. याशिवाय इतर कोणतीही माहिती ते शेअर करत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *