जागतिक कर्करोग दिन ; जीवनशैलीत हे बदल करा 13 प्रकारच्या कॅन्सरपासून होईल बचाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ फेब्रुवारी । भारत कर्करोगाच्या सुनामीच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेच्या क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालात असे म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या मते, २०२० मध्ये भारतात १३ लाखांहून अधिक मृत्यू झाले. आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त जाणून घ्या, कर्करोग कसा टाळता येईल, त्याची लक्षणे काय व आपण काय करायला हवे…

पुरुषांत फुप्फुसाचा कर्करोग व स्त्रियांत स्तनाचा कर्करोग भारतातील सर्वात सामान्य आहे. यासह १३ प्रमुख कर्करोग रोखू शकणारे ५ सोपे उपाय जाणून घ्या-

रात्रीचे जेवण : रात्री ९ च्या आधी करा, धोका २०% घटेल
तुमचे दिवसाचे शेवटचे जेवण आणि झोप यातील अंतर २ तासांपेक्षा कमी नसावे. म्हणजेच तुम्ही ११ वाजता झोपलात तर रात्री ९ वाजण्याच्या आधी जेवण करा. यामुळे प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका २०% कमी होतो.
खरं तर रात्री उशिरा जेवल्यामुळे सर्केडियन रिदम म्हणजेच बॉडी क्लॉक बिघडते, त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते आणि कॅन्सरचा धोका वाढतो.

पाणी : रोज २ लिटर पाणी प्या, ब्लॅडर कॅन्सर टळू शकेल
दररोज पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, दररोज सुमारे दोन लिटर पाणी किंवा द्रवपदार्थाचे सेवन केले तर मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त, हे कोलन कर्करोगापासूनही संरक्षण करते.
वास्तविक पाणी वा द्रव कर्करोग निर्माण करणारे विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकतात. त्यांना तयार होण्यापासूनही प्रतिबंधित करते.

वॉक : लंच ब्रेकमध्ये ३० मि. वाॅक, पोट-यकृत कॅन्सर टळेल
ताशी ५ किमी वेगाने चालणे हा मध्यम तीव्रतेचा व्यायाम मानला जातो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून ५ दिवस लंच ब्रेकमध्ये ३० मिनिटे चालले तर यकृत, पोट, किडनी, स्तन अशा १३ प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
खरं तर चालण्याने कॅन्सरचे हार्मोन्स कमी होतात. स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी चालण्याचा फायदा अधिक होतो.

१ सफरचंद : रोज खा, पाच कॅन्सरपासून संरक्षण करते
रोज एक सफरचंद खाल्ल्याने फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका २५ टक्क्यांनी कमी होतो. त्याचप्रमाणे पचनमार्गाच्या कर्करोगाचा धोका ५० टक्क्यांनी, स्तनाच्या कर्करोगाचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. याशिवाय कोलन आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो.
खरं तर इटलीच्या पेरुगिया युनिव्हर्सिटीनुसार, सफरचंदांतील फ्लेव्होनॉइड्समुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

उपवास : आठवड्यातून एकदा, कॅन्सर पेशी वाढणार नाहीत
कर्करोगाच्या पेशी जगण्यासाठी ग्लुकोजवर अवलंबून असतात. अमेरिकेच्या कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरच्या मते, आठवड्यातून एकदा उपवास केल्याने शरीरातील कर्करोगाचा धोका तर कमी होतोच, पण शरीरात कर्करोग असल्यास तो वाढण्यापासूनही बचाव होतो.
खरं तर उपवासादरम्यान रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *